तुमच्या नावावर किती सिमकार्ड? घरी बसून कसे तपासायचं पहा…

तुमच्या नावावर किती सिमकार्ड

मुंबई : अनेकदा आपल्या नावाचे सिमकार्ड वापरून स्कॅमर तुमची माहिती चोरतात आणि तुमच्या नावावर गुन्हे करू शकतात. तंत्रज्ञानाच्या या युगात, ऑनलाइन घोटाळे आणि सिम कार्ड फसवणूक खूप वाढत चालली आहे. त्यामुळे आपल्या नावावर सध्या तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत याची माहिती घेऊ.

तुमच्या नावाने सिम वापरून, स्कॅमर तुमची माहिती चोरतात आणि तुमच्या नावाने गुन्हे करू शकतात. अशी शक्यता असते की कोणीतरी तुमच्या नावाने सिम वापरत असेल आणि तुम्हाला त्याची माहितीही नसेल. दूरसंचार विभाग संचार साथी पोर्टलवर एक टूल प्रदान करण्यात आले आहे जे वापरुन वापरकर्त्यांना त्यांच्या नावावर किती सिम कार्ड नोंदणीकृत आहेत हे जाणून घेण्यास मदत होते.

सर्वप्रथम संचार साथी पोर्टल sancharsaathi.gov.in उघडा….

image edited

आता होम पेजवरील ‘Citizen Centric Service’ विभाग निवडा

image 1 edited

त्यानंतर ‘Know Mobile Connections in Your Name’ ला क्लिक करा

image 2 edited

आता १० अंकी मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाका

त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाका आणि पुढे जा

image 3 edited

हे केल्यानंतर, आपल्याला आधारशी नोंदणीकृत सर्व मोबाईल नंबरची यादी दिसेल. आणि यावरून आपल्याला किती सिमकार्ड आपल्या नावावर आहेत हे समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *