भारताने गेल्या काही वर्षांत नेमबाजीमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. मनु भाकर, सौरभ चौधरी यांच्यासारख्या तरुण खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. सुरुची फोगाटच्या या सुवर्णपदकाने भारताच्या नेमबाजीच्या उज्ज्वल भविष्याला आणखी बळ मिळाले आहे.
या विजयाबद्दल भारतीय क्रीडा रसिकांनी सोशल मीडियावर सुरुचीचे अभिनंदन केले आहे. तिच्या या यशाने म्युनिकमधील ISSF वर्ल्ड कपमध्ये भारताचा झेंडा उंचावला आहे.
हरियाणाच्या झज्जर येथील 22 वर्षीय नेमबाज सुरुचि फोगाटने आंतरराष्ट्रीय नेमबाजीच्या क्षेत्रात भारताचे नाव उंचावले आहे. म्युनिक येथे नुकत्याच पार पडलेल्या ISSF (इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन) वर्ल्ड कप 2025 मध्ये सुरुचीने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या विजयाने तिने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवा मानाचा क्षण मिळवून दिला.
सुरुचिने अंतिम फेरीत अतिशय चुरशीच्या लढतीत फ्रान्सच्या अनुभवी नेमबाज कॅमिल जेड्रजेव्स्कीला 0.2 गुणांच्या अत्यल्प फरकाने मागे टाकले. सुरुचीने एकूण 241.9 गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला, तर कॅमिलने 241.7 गुणांसह रौप्यपदक मिळवले. तिसऱ्या स्थानावर हंगेरीच्या सारा रॅकने कांस्यपदक जिंकले. सुरुचीच्या या कामगिरीने उपस्थित प्रेक्षक आणि प्रशिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.