वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पुरनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये जवळपास २०० च्या स्ट्राईक रेटने पाच अर्धशतकं आणि ५२४ धावा ठोकणाऱ्या पुरनकडून वेस्ट इंडिज क्रिकेटला आगामी टी-२० विश्वचषकात मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यापूर्वीच त्याने निवृत्तीची घोषणा करुन क्रिकेट बोर्डालाही धक्का दिला आहे. सोमवारी रात्री पूरनने सोशल मीडियावर पोस्ट लिहून याची माहिती दिली. निकोलस पूरनने वेस्ट इंडिजसाठी आतापर्यंत १०६ टी-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे, तर ६१ एकदिवसीय सामनेही तो खेळला आहे. निकोलस पूरनने निवृत्तीची घोषणा केलेली असली तरी तो आता आयपीएलसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळताना दिसून येणार आहे.
आयपीएलमध्ये षटकारांचा पाऊस पाडला, आता अचानक निवृत्तीची घोषणा
