यंदाच्या आयपीएल मोसमात फारशी कमाल न करताच सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं होतं. पण पुढच्या वर्षीचा आयपीएल सुरु होण्याआधीच भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऋतुराज गायकवाड फिट झाला असून तो इंग्लंडला खेळण्यासाठी जाणार आहे. ऋतुराज याच महिन्यात यॉर्कशार संघाशी जोडला जाणार असून दुखापतीनंतर तो पहिल्यांदाच मैदानात दिसेल. ऋतुराज गायकवाड आजपर्यंत ३८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये खेळला असून त्याच्या नावावर अडीच हजारपेक्षा जास्त धावा जमा आहे, तर या यात सात शतकांचाही समावेश आहे. १९९२ मध्ये सचिन तेंडुलकर सुद्धा यॉर्कशायरकडून खेळला होता.
धोनाच्या टीमसाठी गुडन्यूज, ऋतुराज गायकवाड पुन्हा मैदानात
