नवी दिल्ली : ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. मात्र पराभव झाला आणि पुन्हा सरकारी वकील म्हणून रुजू झाले. मात्र अखेर वर्षभरानंतर का होईना उज्ज्वल निकम यांची संसद गाठण्याची इच्छा पूर्ण झाली आहे आणि त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संसदेवर पाठवलंय. राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १२ जणांना खासदार म्हणून नियुक्त करण्याचे अधिकार आहेत. या व्यक्तींकडून त्यांच्या संबंधित क्षेत्रातील व्यक्तींसाठी धोरणात्मक काम अपेक्षित असतं. सध्या चार जागा रिक्त होत्या त्याचीच नियुक्ती झाल्याची अधिसूचना काढण्यात आली आहे.
राष्ट्रपतींकडून २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फासावर चढवणारे वकील उज्ज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला, केरळातील शिक्षक सदानंद मास्तर आणि इतिहासकार मीनाक्षी जैन यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली. उज्ज्वल निकम यांच्यासह नियुक्ती झालेले उर्वरित तीन जण कोण आहेत तेच या बातमीत तुम्हाला वाचायला मिळेल.
१. हर्धवर्धन श्रिंगला
परराष्ट्र सचिव म्हणून हर्षवर्धन श्रिंगला यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय भूमिका निभावली आहे. श्रिंगला हे अमेरिकेत भारताचे राजदूत असतानाच दोन्ही देशांचे संबंध एका वेगळ्या उंचीवर गेले. संयुक्त राष्ट्रात अमेरिकेने जेव्हा जेव्हा भारताच्या मागे उभा राहण्याची भूमिका घेतली त्यात श्रिंगला यांचा मोठा वाटा होता. शिवाय ते भारतात २०२३ ला झालेल्या जी-२० चे मुख्य समन्वयक सुद्धा होते. थायलंड आणि बांगलादेशातही त्यांनी राजदूत म्हणून काम केलं आहे.
२. सी. सदानंद मास्तर
सी सदानंद मास्तर हे केरळातील एक शिक्षक असून आधीपासून भाजपचे सदस्य आहेत. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिलं होतं, मात्र केरळातील हिंसाचारात त्यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले होते. सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचारात सदानंद मास्तरांचे दोन्ही पाय कापून टाकण्यात आले. २५ जानेवारी १९९४ रोजी ही घटना घडली होती.
३. मीनाक्षी जैन
मीनाक्षी जैन या प्रसिद्ध इतिहासकार असून त्या दिल्ली विद्यापाठतील गर्गी कॉलेजच्या सह प्राध्यापिका सुद्धा आहेत.
One thought on “उज्ज्वल निकम यांच्यासह खासदार म्हणून नियुक्त झालेले उर्वरित ३ जण कोण आहेत?”