जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांशी चकमक …
जम्मू-काश्मीर: पूंछमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू-काश्मीर : पूंछ सेक्टरमध्ये भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ही कारवाई भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे केली असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना पूंछ सेक्टरमध्ये दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली होती. शोधमोहिमेदरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केल्यानंतर सुरक्षा दलांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या ज्या परिसरात ही कारवाई करण्यात आली तिथे शोधमोहीम अजूनही सुरू आहे. ज्यामुळे तिथे इतर कोणताही दहशतवादी लपला असेल तर त्याला शोधता येणार आहे. या घटनेनंतर पूंछच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.
पूंछमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यानंतर लष्कर सतर्क झाले असून पुढील काळात होणा-या घडामोडीकडे लक्ष राहणार आहे.