दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर आता सोमवारी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तशी सहमती दिल्याची माहिती मिळत आहे. यामुळं तरी पुढील काळात संसदेचे कामकाज सुरळीत चालण्याची शक्यता आहे.
ऑपरेशन सिंदूर संदर्भात विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात चर्चा करण्याची विनंती केली होती. मात्र तरीही सरकार कडून कुठल्याही प्रकारे ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याचे नाव घेतले जात नव्हते. पण विरोधकांनी यावर आवाज उठविल्यानंतर सोमवारी यावर विशेष चर्चा होणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते कोडीकुनील सुरेश यांनी दिली.
याआधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कॉँग्रेसचे गौरव गोगोई आणि इतर काही नेत्यासोबत बैठक घेतली. आणि यामध्ये ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याचे ठरविण्यात आले आहे. परंतु या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतात का नाही हे पाहणे महत्वाचे आहे.