मुंबई : महाविकास आघाडीचे खासदार केंद्रीय कृषिमंत्र्याच्या भेटीला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्लीत महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह जी चौहान यांची भेट घेतली.
महाविकास आघाडीचे खासदार केंद्रीय कृषिमंत्र्याच्या भेटीला यावेळी खासदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको असल्याची भूमिका मांडली.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने आणि वर्तणूकीमुळे चर्चेत असतात ज्यामध्ये शेतकऱ्यांना अरेरावी करण्याचा प्रसंग असो की कर्जमाफीच्या संदर्भात केलेले विधान असो. त्यांनी आपल्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम केले आहे.
त्यांच्या या असंवेदनशील वागण्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान तर होत आहेच तसेच राज्याच्या उज्ज्वल परंपरेला धक्का देखील बसत आहे. म्हणूनच त्यांचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांच्याऐवजी संवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा संवेदनशील कृषीमंत्री महाराष्ट्राला द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी केली.