नवी दिल्ली : महादेवी परत येणार! धनंजय महाडिक केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्या भेटीला कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणीच्या महादेवी हत्तीणीला पुन्हा मठात आणण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वनमंत्री नामदार भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावेळी केंद्रीय वनमंत्री यादव यांनी कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती महाडिक यांनी दिली.
महादेवी परत येणार! धनंजय महाडिक केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्या भेटीला कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील लाडक्या महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महादेवी हत्तीणीशी नांदणीसह हजारो नागरिक आणि भाविकांच्या भावना जोडल्या आहेत त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर महादेवीला गुजरातला हलवल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याची माहिती यादव यांना देण्यात आली.
वनमंत्री भूपेंद्र यादवजी यांनी जनभावनांचा आदर करत, या प्रकरणात सर्व कायदेशीर पर्याय तपासून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. पुढील आठवड्यात या संदर्भात बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या प्रयत्नांमुळे नांदणी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि महादेवी लवकरच आपल्या घरी परत येईल, अशी आशा असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.