भारत सरकारच्या वतीने १६ व्या जनगणनेची अधिसुचना सोमवारी जारी केली असून ही जनगणना दोन टप्यात होणार आहे. या जनगणनेत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातनिहाय लोकसंख्या मोजली जाणार आहे. तसेच ही भारताची एकूण १६ वी तर स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना असेल.
ही जनगणना २०२६-२७ या आर्थिक वर्षात दोन टप्प्यात पार पडेल. त्यातील पहिला टप्पा १ ऑक्टोबर रोजी सुरू होईल ज्यात हिमालयीन भागातील जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. तर दूसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून संपूर्ण भारतात सुरू होईल. या सगळ्या प्रक्रियेला १३ हजार कोटी रुपयांचा खर्च अंदाजित असेल आणि यात ३६ प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. ही जनगणना पूर्ण झाल्यानंतर या आकडेवारीच्या आधारे २०२८ चे मतदार पुनर्रचना, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आरक्षित जागा निश्चित करणे आणि महिला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणे ही प्रमुख कामे मार्गी लागणार आहेत.