मुंबई : सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायाधीस भूषण गवई यांनी एका कार्यक्रमात न्यायाधीश, वकील अथवा कोणीही ज्यांना खुर्ची मिळते त्यांनी ती डोक्यात न जाऊ देता जे आपलं कर्तव्य आहे ते पूर्ण केलं पाहिजे असे सांगितले. आपल्याला जी खुर्ची सेवेसाठी मिळते ती लोकांची सेवा करण्यासाठी मिळालेली असते असेही ते पुढं म्हणाले.
सरन्यायाधीश एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी नुकत्याच लॉ पदवी प्राप्त केलेले आणि कोणतीही प्रॅक्टिस न केलेले जे वकील असतात ते जर पहिल्याच दिवशी जज झाले तर त्यांच्या डोक्यात खुर्ची सेवेसाठी जाते. तसेच ते म्हणाले की, इथून पुढे जिथे न्यायालयाचे कार्यक्रम असतील तिथे समोर स्टेजवरील ज्या खुर्च्या असतात त्या एक सारख्या ठेवण्यात याव्यात.
वकील आणि न्यायाधीश हे दोघेही समान आहेत आणि वकिलांना खराब वागणूक न देता न्यायाधीशांनी न्यायालय परिसरात खेळीमेळीचे वातावरण कसे राहील यावर भर दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेले वक्तव्य हे फक्त न्यायालय आणि त्या संबंधित असले तरी ते सगळीकडे लागू होते.