शेतकऱ्याचा मुलगा कृषिमंत्री, भरणे मामाची पहिली प्रतिक्रिया काय?

शेतकऱ्याचा मुलगा कृषिमंत्री

मुंबई : शेतकऱ्याचा मुलगा कृषिमंत्री, भरणे मामाची पहिली प्रतिक्रिया काय? राज्य मंत्रिमंडळ सदस्यांमध्ये खाते बदल झाले असून वादात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले असून त्यांच्याकडील क्रीडा व युवकल्याण खाते कोकाटे यांना देण्यात आले आहे. खाते बदलल्यानंतर नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषिमंत्री पद दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

शेतकऱ्याचा मुलगा कृषिमंत्री भरणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या कृषी मंत्रीपदाची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

भरणे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी शेतकरी कुटुंबात जन्मलो, वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात. आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. शेतकऱ्यांचा सन्मान, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.

कोकाटे आणि भरणे यांच्या खाते बदलानंतर आता तरी हा वाद थांबतो का हे आगामी काळात समजणार आहे. परंतु भरणे यांना कृषिमंत्री पद दिल्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *