सुरेश धसांच्या मुलाने दुचाकीस्वाराला उडवलं, जागेवरच मृत्यू झाल्याने गुन्हा दाखल

Sagar Dhas accident

अहिल्यानगर : भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या एमजी हेक्टर या गाडीखाली येऊन अहिल्यानगरमधील तरुणाचा मृत्यू झाला आहे. सागर धस हा अहिल्यानगरहून पुण्याला जात असताना त्याने पुढे चाललेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर दुचाकीस्वाराला दवाखान्यात नेईपर्यंतच त्याचा मृत्यू झाला. मात्र सोमवारी रात्री गुन्हा घडल्यानंतरही मंगळवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुच होती. या विलंबामुळे पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

नितीन शेळके असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. सागर धस या सुरेश धस यांचा धाकटा मुलगा आहे. सुरेश धस सध्या अधिवेशनात व्यस्त असतानाच सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडल्यामुळे धस कुटुंबाचं टेन्शन वाढलं आहे. 

मयत नितीन शेळके यांच्या कुटुंबातून अजून कुणीही पुढे येऊन याविषयी बोललेलं नाही, शिवाय पोलिसांनीही अधिकची माहिती दिलेली नाही. मात्र सागर हा स्वतः गाडी चालवत होता की अजून कुणी चालवत होतं याविषयी खात्री केली जात आहे. नितीन शेळकेंच्या मृत्यूला जबाबरदार ठरल्याप्रकरणी सागर धसवर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

One thought on “सुरेश धसांच्या मुलाने दुचाकीस्वाराला उडवलं, जागेवरच मृत्यू झाल्याने गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *