शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. कडू यांनी उपचार घेण्यास नकार दिला असून आता सरकार काय भूमिका घेते पाहणं महत्वाचं असणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भ दौऱ्यावर असून प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करतील या कारणाने त्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवले आहे. दरम्यान आज बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यातील विविध नेते भेट देणार आहेत.