पुणे :हा देश कोणाच्याही मनमानीने चालणार नाही भारत एक सशक्त लोकशाही असलेला देश आहे आणि तो कोणाच्याही मनमानीने चालणार नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांनीच हा देश चालणार असल्याचे सांगत दिल्लीमधील अधिवेशन काळात घडलेली संपूर्ण परिस्थिती खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितली.
हा देश कोणाच्याही मनमानीने चालणार नाही, सुप्रिया सुळेंची सरकारवर गंभीर टीका महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा गुंतवणुकीची स्थिती जी निर्माण झाली आहे त्याला महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कारणीभूत आहे. लाडकी बहीण योजनेत 4900 कोटी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे सुप्रिया सुळे यांनी केली.
सुळे पुढे म्हणाल्या, सत्ता आणि पैसा आल्यावर गाडी कशी चुकीच्या ट्रॅक वर जाऊ शकते याचे देशातील सर्वात मोठे दुर्दैवी उदाहरण म्हणजे महाराष्ट्र शासन असल्याचे सांगितले.
यावेळी सुळे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात दोन-तीन विशिष्ट भाग आहेत जिथं प्रचंड गुन्हेगारी वाढत आहे. दुर्दैवाने जशी पुणे जिह्यात गंभीर परिस्थिती आहे तशी बीडमध्ये निर्माण झालीय त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला नाही याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.