बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई तालुक्यातील प्रज्वल परशुराम दराडेचे याने आयआयटी जेईई अडव्हानस ही देशातील सर्वात कठीण परीक्षा उतीर्ण केली असून त्याचा आयआयटी वाराणसीत येथे बीटेक इंडस्ट्रियल केमिस्ट्री साठी प्रवेश निश्चित निश्चित झाला आहे. प्रज्वल हा आंबेजोगाई तालुक्यातील मूर्ती या गावचा रहिवाशी असून त्याचे 1 ते 10 शिक्षण लातूर शहरात आर. एन. मोटेगावकर शाळेत पूर्ण झाले आहे. त्याने जेईईची तयारी राजस्थानमधील कोटा येथे राहून केली आहे. भारतातून त्याची ओपन कोट्यातून 17246 वी रॅंक असून ओबीसी कोट्यातून 4409 रॅंक आहे.
तसेच प्रज्वलने MHT-CET मध्ये सुद्धा घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामागे प्रचंड मेहनत आणि प्रयत्न आहेत. एकंदरीत भारत देशातील सर्वात कठीण समजली जाणारी परीक्षा प्रज्वल उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचे अभिनंदन करून कौतुक करण्यात येत आहे. या यशामध्ये त्याचे शिक्षक आणि आई-वडिलांचा मोठा वाटा असून त्यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.
धन्यवाद बडे साहेब