मुंबई : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील डोंगरी गावे ही डोंगरी भाग म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी डोंगरी जन परिषदेच्या वतीने 17 सप्टेंबर 2025 बुधवारपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण सुरू असून जवळपास 17 दिवस झाले आहेत.
महाराष्ट्र सुदूर संवेदन उपायोजना केंद्र, नागपूर यांनी गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भागाचे चुकीचे सर्वेक्षण करून डोंगरी भागात एकही गाव येत नसल्याचा अहवाल शासनास सादर केला आहे. सुदूर संवेदन केंद्र नागपूर यांनी केलेल्या चुकीच्या अहवालाची तपासणी राष्ट्रीय सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, हैदराबाद यांच्यामार्फत करून डोंगरी भागाचे पुनरसर्वेक्षण करून सर्वेक्षणाअंती डोंगरी भागातील समाविष्ट गावांसह डोंगरी भाग म्हणून जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी डोंगरी जन परिषदेच्या वतीने आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात येत आहे.