पुणे : कोथरूड पोलिस ठाण्यात रात्री 3 वाजता पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीच्या अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर आणि इतर काही पक्षांची नेते पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात रात्री तीन वाजेपर्यंत ठाण मांडून होते. कोथरूड परिसरात राहणाऱ्या तीन मुलींना पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची चौकशी करण्यासाठी ठाण्यात आणून जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी रात्री तीन वाजेपर्यंत ही सगळी मंडळी उपस्थित होती.
कोथरूड पोलिस ठाण्यात रात्री 3 वाजता पवार रोहित पवार यांनी म्हटले की, छत्रपती संभाजीनगर येथील एका केसच्या तपासासाठी आलेल्या तेथील पोलिसांसह कोथरुड पोलिसांनीही पुण्यातील मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करून त्यांना मारहाण केली. याबाबत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची दोन दिवस मागणी करुनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत, याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित मुली पुणे पोलिस आयुक्तालयात दिवसभर बसून आहेत,
तरीही पोलिस त्यांची दखल घेत नाहीत. या मुलींना भेटून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्या कोथरुडसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित व्हीआयपी केससाठी दबाव कुणी आणला, संबंधित निवृत्त पोलिस अधिकारी कोण आहे? झिरो पोलिस असलेली महिला, या सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, याबाबत सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा साहेब आणि अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील साहेब यांच्याशीही चर्चा केली.
या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी एक लेखी पत्र देऊन यासंदर्भात प्रत्यक्षदर्शी कुठलाही पुरावा नसल्याने आणि हे प्रकरण प्रशासकीय अधिकाऱ्या विरोधात असल्याने त्याची प्राथमिक चौकशी करून त्यानंतर गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे सांगितले.