मंबई : सरकारचे धोरण, नियम, निर्णयांवर जर राज्य सरकारच्या कर्मचा-यांनी सरकारवर टीका केली तर आता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने काल सोमवारी एक परिपत्रक काढले असून त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना समाजमाध्यमावर व्यक्त होताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे परिपत्रकात?
शासकीय कर्मचारी त्यांचे वैयक्तिक आणि कार्यालयीन समाजमाध्यम खाते वेगवेगळे ठेवतील. बंदी घातलेल्या वेबसाइट न वापरणे, माध्यमांचा वापर शासकीय योजनेच्या प्रचार आणि प्रसार यासाठी वापरणे. स्वत:ची प्रशंसा न करणे, आदि सुचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय जर शालकीय पद, गणवेश, वाहन, इमारत वापरून रील करणे किंवा टिका केल्याचे आढळून आल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे नमुद करण्यात आले आहे.