बीड : सोशल मीडियावर ऑनलाईन व्हिडिओ प्रसारित करून दोन जातीत तेढ निर्माण करणे आणि माजी मंत्री आमदार धनंजय मुंडेंच्या बदनामीचे प्रकरण यांची बदनामी करण्याचे काम बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याने केले होते. त्यावेळी या प्रकरणात कासले विरोधात गुन्हा दाखल सुद्धा झाला होता. आता या प्रकरणात बीड सत्र न्यायलयाने पोलिस उपनिरीक्षक कासलेचा जामीन अर्ज फेटाळला असल्याचे अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले याने सोशल मीडियावर ऑनलाईन व्हिडिओ प्रसारित करून दोन जातीत तेढ निर्माण करणे आणि विद्यमान आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या बदनामीचे प्रकरण विषयी यांना अर्वाच्छे भाषेत शिवीगाळ, तसेच अश्लील टिप्पणी केली होती. यामुळे ३० मे रोजी सायबर पोलिस स्टेशन बीड येथे कासले विरोधात फिर्यादी मोहन आघाव यांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात कासले याच्या वकिलांकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता मात्र तो अर्ज बीड येथील दुसरे सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे.
या प्रकरणात फिर्यादीची कायदेशीर बाजू अॅड किशोर खेडकर यांनी मांडली तर त्यांना सहकार्य अॅड अनिल बारगजे, अॅड बी.एन.झिने, अॅड विलास ढाकणे, अॅड विग्ने व अॅड एस.ए.चव्हाण यांचे सहकार्य लाभले.