बच्चू कडूंना उच्च न्यायालयाकडून ३ महिन्याची शिक्षा; कारण काय?

बच्चू कडूंना उच्च न्यायालयाकडून ३ महिन्याची शिक्षा; कारण काय?

मुंबई :बच्चू कडूंना उच्च न्यायालयाकडून ३ महिन्याची शिक्षा; कारण काय? 2017-2018 च्या दरम्यान महायुती सरकार च्या काळात सरळसेवा परीक्षा घेण्यासाठी महापरीक्षा पोर्टल ह्या खासगी कंपनीला सरकारने टेंडर दिले होते. ह्यामध्ये मध्यप्रेदशच्या महाव्यापम घोटाळ्यात सहभागी असलेल्या व ब्लॅक लिस्टड असलेली UST GLOBAL ह्या कंपनी चा देखील सहभाग होता. त्या कंपनीने मोठ्या प्रमाणात घोटाळे केले असल्याचे उघड झाले आणि त्यानंतर कडूंनी आंदोलन केले होते. यावेळी सरकारी कामात अडथळा झाला म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या प्रकरणात तीन महीने शिक्षा सुनावली आहे.

त्यावेळी परीक्षा अतिशय अपारदर्शक पद्धतीने महापरीक्षा पोर्टलकडून पार पडल्या जात होत्या. पेपर लीक होत होते. मास कॉपी होत होती, प्रश्नांची पातळी घसरली होती. सैराट UK Replica offers a variety of 1:1 best Replica rolex GMT-Master II, high quality fake rolex GMT-Master-II. चीं अभिनेत्री कोण असे प्रश्न विचारले जात होते. पैसे घेऊन नोकरी लावून देणारे रॅकेट महाराष्ट्रात कार्यरत होते. खूप साऱ्या सेंटर वर परीक्षा पार पाडताना तांत्रिक अडचणी उद्भवत होत्या. शिवाय, मोबाईल चा वापर पेपर सोडवताना होत होता.

त्या प्रकरणात तत्कालीन आयटी संचालकांकडे जाब विचारायला गेलो. पण तत्कालीन संचालकानं सरळसरळ उडवाउडवीची उत्तरं दिली, आणि उलट आमच्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. सेवा हमी कायदा असतानाही आजपर्यंत एकाही भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही. लोकशाहीत कायदा हा सामान्य माणसासाठी राहिला आहे का? असा प्रश्न बच्चू कडूंनी सरकारला विचारला आहे.

या निर्णयाविरुद्ध बच्चू कडू वरच्या न्यायालयात दाद मागणार असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा थांबणार नाही आणि सत्य बाहेर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *