बीड : सध्या सोशल मिडीयात एक कराडची बांगरांच्या पत्नी सोबतची ऑडीओ क्लिप व्हायरल होत असून त्यामध्ये एक महिला जी विजयसिंह बांगर याची पत्नी वाल्मीक कराड याच्याशी संवाद साधत आहे. यामध्ये कराड संबंधीत सोशल मिडीयात केलेली पोस्ट डिलीट करण्याची विनंती करत असून महिला मात्र बांगर आणि त्यांच्या आई-वडीलांकडून होत असलेला छळ सांगून मदतीची विनंती करत आहे. विजयसिंह बांगर हे वाल्मीक कराडचे एकेकाळचे सहकारी होते मात्र मागील काही दिवसांपासून त्यांनी कराडविरोधात पत्रकार परिषद घेवून खळबळजनक आरोप केले आहेत. कराडची बांगरांच्या पत्नी सोबतची ऑडीओ क्लिप व्हायरल यानंतर आता बांगरच्या पत्नीशी संवाद झालेली कराडची बांगरांच्या पत्नी सोबतची ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने उलट चर्चा व्हायला सुरवात झाली आहे.
व्हायरल ऑडीओ क्लिपमध्ये काय आहे?
१ महिला आणि कराडमध्ये झालेला संवाद असून यामध्ये महिलेने सोशल मिडीयात केलेली पोस्ट डिलीट करण्याची विनंती कराड करत आहे. मात्र महिला विजयसिंह बांगर यांच्यासह त्यांच्या आई-वडीलांकडून झालेला छळ सांगून कराडकडे मदतीची विनंती करते. ती महिला म्हणते आहे, चार वर्षांपूर्वी आमचं लग्न झाले, ते मला व्यवस्थित नांदवत नाहीत, मारहाण करतात, त्यांची आई आणि बहिण देखील यामध्ये सामील आहेत, ते त्याला पाठिंबा देतात.
माझ्या पोटात बाळ असताना त्यांनी मला ते खाली करायला सांगितलं होतं आणि माझ्या बाळाला दोन वर्षे झाली कसलीही मदत केलेली नाही. माझ्या वडीलांकडून हुंडा घेतला, यांना काय कमी आहे, त्यांनी माझ्या घरच्यांकडून कर्ज घेतलेलं हुडांसाठी ते अजूनही माझे घरचे फेडत आहेत, लग्नाच्या दिवशी त्यांनी घरच्यांना माझ्या वेठीस धरलं आणि पाच लाख रूपये घेतले. मला घराबाहेर काढल्यापासून घरी एक मुलगी आहे आणि त्यांना त्या मुलीशी लग्न करायचंय काय मला अंदाज नाही.
तर पुढं महिला म्हणते, जर नवरा चांगला असता तर त्याने मला नांदवलं असतं. मी जी पोस्ट केली त्यासाठी त्यानेच मला मजबूर केलं आहे. माझ्या सासऱ्यांना सांगितलं होतं की, मला माझ्या लेकऱ्याला काहीतरी द्या, मी आजही तिथं जायला तयार असून सासरी राहायला तयार आहे. माझ्या चरित्र्यावर संशय घेतात आणि काहीही बोलतात. त्यांची वागणूक चांगली नाही आणि तेच माझ्यावरती आरोप करत असतात. मला नांदवायला सांगा, नाहीतर त्याला आर्धी संपत्ती द्यायला सांगा. आपण बसून बोलू असं ते म्हणाले, त्यांच्याशी तुम्ही बोला आण्णा, मला जाताना त्याने घाण घाण शिव्या देऊन गेला आहे. असा आरोप त्या महिलेने केला आहे.
या क्लिपची स्टोरी डॉट कॉम पुष्टी करत नाही मात्र व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे बांगरच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.