सातारा : रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेबांना मी सगळे अधिकार बहाल केलेले आहेत. त्यांच्या वयाच्या हिशोबाने आणि या वयात त्यांना त्रास होऊ नये अशी व्यवस्था करणार असल्याची माहिती पंचायत राज व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरेंचं वक्तव्य यांनी दिली आहे.
मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊत यांचे जे विधान होते त्याविषयी बोलताना ते म्हणाले की, त्याबद्दल त्यांना विचारा मला का विचारत आहेत. त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेले भाकित आहे. त्यासंदर्भात मी कसा काय बोलू शकतो? त्या बाकीच्यासंदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा. कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी ही संजय राऊत यांच्याकडून फायनल होऊन आमच्या वरिष्ठांकडे जात असेल! असेही म्हणाले .
पुढं बोलताना ते म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्थानिक परिस्थिती काय आहे, त्याच्यावर अवलंबून राहतात. जर पक्षपातळी, वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला, तर त्याची अंमलबजावणी करणे आमची जबाबदारी आहे. जर असं जरी असलं तरीसुद्धा वरिष्ठांची आणि आमची इच्छा असली तरी काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे, की एकत्र लढू शकत नाही असे काही मतदारसंघ , तालुके आहेत की त्या ठिकाणी त्या त्या स्तरावरील निर्णय घेण्यास वरिष्ठ निर्णय घेतील आणि मला वाटते तसेच परिस्थिती निर्माण होईल, त्या त्या ठिकाणी वेगवेगळे निर्णय घेतले जातील..
जनता दरबाराबाबत विचारले असता, सरदारांचा दरबार असतो, लोकसेवकांचा नसतो. मी सरदार नाही मी जनतेचा लोकसेवक आहे असे सांगत अप्रत्यक्षरित्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर खोचक टीका पंचायत राज ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. nimbalkar,gore,satara.