मुंबई, प्रकाश पाटील :मालेगाव प्रकरणात इम्तियाज जलील यांची हायकोर्टात याचिका; निर्दोष मुक्ततेविरोधात लढा सुरु २००८ मध्ये मालेगावमध्ये घडलेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष ठरवल्यानंतर देशभरात राजकीय आणि सामाजिक वादळ निर्माण झाले.
मालेगाव प्रकरणात इम्तियाज जलील यांची हायकोर्टात याचिका; निर्दोष मुक्ततेविरोधात लढा सुरु विशेष म्हणजे या निकालानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी न्यायालयीन निर्णयाविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे त्यांनी या निकालावर पुनर्विचार करण्याची मागणी करत, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला लढा सुरु असल्याचे स्पष्ट केले आहे.
या खटल्यात सध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, स्वामी असीमानंद यांच्यासह सात आरोपींना १७ वर्षांच्या लांबटलेल्या खटल्यानंतर निर्दोष मुक्त करण्यात आले. NIA न्यायालयाने ३१ जुलै २०२५ रोजी निकाल देताना स्पष्टपणे नमूद केलं की, या प्रकरणात प्रस्तुत पुरावे पुरेसे ठरणारे नाहीत आणि त्यामुळे आरोपींवर गुन्हा सिद्ध होत नाही. “संशय म्हणजे पुरावा नव्हे”, असे म्हणत न्यायालयाने सगळ्यांना निर्दोष घोषित केलं.
इम्तियाज जलील यांनी या निकालावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. “जर सर्व आरोपी निर्दोष असतील, तर मग स्फोट घडवणारा कोण होता?” हा सवाल त्यांनी सरकार आणि न्यायव्यवस्थेकडे रोखठोकपणे उपस्थित केला होता. त्यांच्या मते, या निकालामुळे पीडितांचे दु:ख अधिक खोल झाले असून, एका प्रकारे ही न्यायव्यवस्थेची चूक नाही, तर ती एक न्यायाची हत्या आहे. केवळ आरोपींची निर्दोषता जाहीर करून न्याय झाला, असे मानणे चुकीचे आहे. या घटनेत जे लोक मारले गेले, त्यांचा दोष कुणावर? त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
हाच मुद्दा घेऊन इम्तियाज जलील यांनी आपल्या वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, या निकालामुळे केवळ पीडितांनाच नव्हे, तर संपूर्ण देशातील सामान्य जनतेच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला हादरा बसला आहे. तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात आणि सादर केलेल्या पुराव्यांमध्ये विसंगती आहे, तर काही साक्षीदारांचे जबाबच राजकीय दबावाखाली बदलण्यात आल्याची शक्यता आहे, असा संशय त्यांनी याचिकेत व्यक्त केला आहे.
इम्तियाज जलील यांनी केवळ न्यायालयात याचिका दाखल केली नाही, तर मालेगावच्या पीडित कुटुंबीयांनाही भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी पीडितांना सांगितले की, “हा लढा तुमचा नाही, तो माझाही आहे. हे केवळ मालेगावचे प्रकरण नाही, तर देशात न्यायाच्या मूलभूत तत्त्वांवरचा प्रश्न असल्याचे सांगितले.