लातूर, माणिक मुंडे : पतीने मैत्रीणीला फिरायले नेले असे विचारले असता पती, मैत्रीण, सासू व दीर या चौघांनी संगणमत करून पेट्रोल टाकून पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे दिनांक 24 रोजी, गुरवारी घडली आहे. याप्रकरणी रेणापूर पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
फातिमा कुरेशीने दिलेल्या जबाबावरून पतीने मैत्रीणीला फिरायले नेले गुरुवार दिनांक 24 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पती तोफिक कुरेशी यास तू तुझ्या मैत्रिणीला फिरायला का घेऊन गेलास असे विचारले असता पती तोफिक कुरेशी याने अंगावर पेट्रोल ओतले. आणि मैत्रीण हिना पठाण हिने काडी पेटवून अंगावर टाकली तर सासू फैमून कुरेशीने दरवाजा बंद केला व दीर शफिक कुरेशी याने दरवाजा बाहेरून लावून घेतला. चौघांनी संगणमत करून महिलेस जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून पीडित महिला 70 टक्के भाजली आहे. पिडीत महिलेस उपचारासाठी लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
पीडित महिलेच्या जबाबवरून रेणापूर पोलिसात पतीसह चौघां विरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी करीत आहेत.