शिर्डी : साईबाबांविषयी हिंदू सेनेच्या युवराजांचे आक्षेपार्य वक्तव्य हिंदू सेनेच्या संत युवराज महाराज यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये साई बाबा यांच्याविषयी आक्षेपार्य वक्तव्य करण्यात आले आहे. या व्हिडिओमुळे साईभक्तांच्या भावना दुखावल्या असून शिर्डीतील ग्रामस्थ याप्रकरणी आक्रमक झाले आहेत.
साईबाबांविषयी हिंदू सेनेच्या युवराजांचे आक्षेपार्य वक्तव्य हिंदू सेनेच्या संत युवराज महाराजांनी देशभरातील हिंदू मंदिरातील साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचे आवाहन एका व्हीडिओत केले आहेत. यात त्यांनी साई मूर्तींना हातोड्याने तोडून गटारीत सोडा असेही बोलले आहे. साईबाबा मुस्लिम आणि व्यभिचारी असल्याचे यात वक्तव्य करण्यात आले असून संत युवराज यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता झाली आहे.
व्हायरल व्हिडिओ नंतर साईबाबा संस्थानकडून शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. साईबाबांची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती शिर्डी ग्रामस्थ आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी दिली आहे.