लातूर, माणिक मुंडे :अखेर ‘त्या’ जळीत महिलेची सहा दिवसानंतर प्राण ज्योत मावळली रेणापुर तालुक्यातील पानगाव येथे नवऱ्यास तु तुझ्या मैञीनीला फिरायला का घेवुन गेलास म्हणुन पत्नीने विचारला असता तिला जिवंत जाळण्याचे प्रयत्न करण्यात आले. अखेर 6 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अखेर ‘त्या’ जळीत महिलेची सहा दिवसानंतर प्राण ज्योत मावळली फातीमा कुरेशी या विवाहीत महिलेस तिच्या पती, त्याची मैञीन,सासु व दिर या चौघांनी संगनमत करून पेट्रोल टाकुण पेटवुन दिल्याची घटना गुरुवार २४ जुलै रोजी सकाळी घडली होती. त्यात ती महिला ७०% जळाल्याने तिच्यावर उपचार सुरु असताना बुधवार ३० जुलै रोजी अखेर तिची प्राण ज्योत मावळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पानगाव ता.रेणापुर येथील २५ वर्षीय विवाहीत महिला फातीमा तोफीक कुरेशी हिने पती तोफीक कुरेशी यास तु तुझ्या मैञीनीला फिरायला घेऊन का गेलास असे विचारले असता पती तोफीक याने अंगावर पेट्रोल टाकले व तोफीक याची मैञीन हिना पठाण हिने काडी पेटवुन अंगावर टाकली तर सासु फैमुन कुरेशी हीने दरवाजा बंद केला व दिर शफीक कुरेशी याने बाहेरून दार लावले चौघानी संगनमत करुन फातीमा यांच्या अंगावर पेट्रोल टाकुन जिवे मारण्याचा प्रयत्न २४ जुलै रोजी केला असता ती महिला 70 टक्के भाजली होती. त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.