मुंबई :अखेर कोकाटेंना कृषीमंत्री पदावरून हटवलं विधिमंडळ परिसरात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वादात सापडलेले माणिकराव कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यात खाते बदल करण्यात आला आहे.
अखेर कोकाटेंना कृषीमंत्री पदावरून हटवलं माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिमंत्री पद काढून मंत्रिमंडळातील दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले आहे. तर भरणे यांच्याकडील असलेले क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औेकाफ हे खाते आता कोकाटे यांच्याकडे असणार आहे.
विधिमंडळ सभागृहाचे अधिवेशन चालू असताना कोकाटे यांनी मोबाईल मध्ये रमी हा जुगाराचा खेळ खेळला होता. याविषयी आमदार रोहित पवार यांनी त्यांचा व्हिडिओ व्हायरल करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु सरकारच्या वतीने त्यांचा राजीनामा न होता खाते बदल झाले आहे.
माहिती व जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीत राज्य मंत्रिमंडळातील दत्तात्रय भरणे व माणिकराव कोकाटे यांच्याकडील खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार कृषी खाते दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले असून क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औेकाफ हे खाते माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आले आहे.
खाते बदलानंतर तरी आता माणिकराव कोकाटे यांच्यावरील संकट टळल्याचे सध्यातरी दिसत आहे.