सातारा : बहीण-भावामध्ये न्यायालयात झालेल्या तडजोडीचा हुकूमनामा मुद्रांकित करून देण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना स्वीकारल्याप्रकरणी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
पल्लवी रामदास गायकवाड कारंडे (रा. पुसेगाव, ता. खटाव) असे संबंधित कनिष्ठ लिपिक महिलेचे नाव आहे.
तक्रारदार यांचा वडिलोपार्जित मिळकतीबाबतचा बहिण, भाऊ यांच्यामध्ये कौटुंबिक दावा सातारा येथील दिवाणी न्यायालय सुरू होता. पाच हजारांची लाच घेताना या प्रकरणांमध्ये उभय पक्षांमध्ये तडजोड झाली. सैदापूर येथील तलाठी कार्यालयामार्फत हा तडजोड हुकूमनामा मुद्रांकित करून आणण्यात यावा, असे आदेश बजावण्यात आले.
संबंधित तक्रारदाराने हा हुकूमनामा मुद्रांकित करण्यासाठी सहजिल्हा निबंधक वर्ग एक मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज केला होता. मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथील चुकावलेला मुद्रांक शुल्क
या कार्यासनाचा पदभार असलेल्या लोकसेविका पल्लवी गायकवाड यांनी तक्रारदारांना पंचांसमक्ष पाच हजार रुपये लाच मागितली. त्यांना ही लाच स्वीकारताना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या सूचनेनुसार पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.