बीड : परळी तालुक्यातील व्यापारी महादेव मुंडेंच्या मृत्यूचा योग्य तपास होत नसून त्या संदर्भात त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आज बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात गेल्या होत्या. मात्र त्यांना पोलिस प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य करण्यात येत नसल्याचा आरोप करत त्यांनी आपल्याला न्याय मिळत नसल्याचे सांगत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेरच विष प्राशन केलं.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर विष प्राशन केल्याचं लक्षात आल्यानंतर तात्काळ तेथील कर्मचारी आणि आरोग्य विभागाच्या अँब्युलन्सने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेण्यात आले. मुंडे यांची सध्या प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळाली असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.
स्व. महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणी तपास संथगतीने होत असून १८ महिन्यांनंतर देखील आरोपी मोकाट असल्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान त्यांनी आज १६ जुलै रोजी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन केले. ही घटना अतिशय हृदयद्रावक घडली असून त्यांची प्रकृती नाजूक आहे.