पुणे :गुंतवणूकदारांवर दबावाची मुख्यमंत्र्यांनी दिली कबुली मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी गुंतवणूकदारांवर विविध मार्गांनी दबाव येत असल्याची कबुली दिली असल्याची माहिती आ. रोहित पवार यांनी दिली. यावेळी पवारांनी अनेक प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर देण्याची मागणी केली.
गुंतवणूकदारांवर दबावाची मुख्यमंत्र्यांनी दिली कबुली रोहित पवारांनी सोशल माध्यमावर एक पोस्ट करून सांगितले आहे की, ‘आम्हालाच कंत्राटं द्या, आमचीच माणसं घ्या, आम्ही सांगू त्याच दराने काम करा’, असा दबाव गुंतवणूकदारांवर टाकला जात असल्याची कबुली काल पुण्यात खुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच दिली हे एका अर्थाने बरंच झालं. या दबावामुळं उधळपट्टीला तरी ब्रेक लागेल.
आता PWD कडून राज्यात मोठ्या प्रमाणात कामं होत असतानाही या विभागाला समांतर अशा MSIDC ची स्थानपा का केली? याअंतर्गत होणारी कामं कुणाला दिली जातात? का दिली जातात? त्यासाठी कोण दबाव टाकतं? याचीही उत्तरं राज्याला मिळाली पाहिजेत. शिवाय संबंधित कंत्राटदारांची नावंही मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर करावीत आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळं तिजोरीची लूट होणार असेल तर ती रोखण्यासाठीही काय पावलं उचलणार हेही जाहीर करायला हवं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली.
त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष देऊन तत्काळ कार्यवाही करणार का हे पुढील काळात समजेल.