नाशिक : सात लाखांची खंडणी मागणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेना महिला पदाधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील फॅमिली रेस्टॉरंट अॅण्ड बार सुरु ठेवण्यासाठी सात लाख रुपये खंडणीची मागणी करत धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) च्या महिला पदाधिकाऱ्यासह तिच्या पतीविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात पंढरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हॉटेल मालक आशुतोष कृष्णा गडलिंग यांनी फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते रॉयल लिस्टो फॅमिली रेस्टॉरंट अॅण्ड बार चालवतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ ते १४ जुलैदरम्यान संशयित श्रृती यतिन नाईक व तिचा पती यतिन नाईक यांनी संगनमत करून व्यवसायात अडथळा निर्माण केला. हॉटेलमुळे त्रास होतो असे सांगत त्यांनी ग्राहक व वेटरची अडवणूक केली. हॉटेल सुरु ठेवायचे असल्यास सात लाख रुपये खंडणी द्यावी लागेल अन्यथा हॉटेल बंद पाडू, अशी धमकी देण्यात आलेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी बारचालकाने तातडीने पोलीस ठाणे गाठत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.