पुणे : पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का मानला जातो. १ ऑगस्ट रोजी रमेश थोरात हे दौंड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वरवंड येथे जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत रमेश थोरात यांचा हा प्रवेश होणार आहे.
दौंडचे माजी आमदार रमेश थोरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. दौंड तालुका हा गेल्या अनेक वर्षांपासून कुल-थोरात यांच्या राजकीय गटबाजीमुळे ओळखला जातो. राजकीय पक्षांपेक्षा येथे व्यक्ती केंद्रीय राजकारणाला महत्त्व असल्याचे आजवर दिसून आले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून अजित पवारांना धक्का देण्याचे काम केले होते. मात्र आता रमेश थोरात हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांनी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे काम केले होते तर यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला होता. थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांनी दौंडचे आमदार कुल यांच्या विरोधात आमदारकीची निवडणूक लढवली होती या निवडणुकीत थोरात यांना पराभव पत्करावा लागला होता. थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.