लातूर, माणिक मुंडे : काँग्रेसचा कार्यकर्ता आहेस का तू? एका स्थानिक प्रकरणाच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील आमदार रमेशआप्पा कराड यांनी “काँग्रेसचा कार्यकर्ता आहेस का तू?” आमदाराने शासकीय अधिकाऱ्याला धारेवर धरत प्रश्न विचारल्याने ते चर्चेत आले आहेत.
हिप्पर्गे काँग्रेसचा कार्यकर्ता आहेस का तू? नीट नोकरी करायची आहे का, नवकर आहेस का काँग्रेसचा तू? नखरे केले तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव. सर्व काँग्रेसचे काम करतो हा? काँग्रेसच्या पुढाऱ्याचे ऐकून गोर गरीब शेतकऱ्याची अडवणूक करतो? असे विचारले. एका लोकप्रतिनिधीकडून शासकीय यंत्रणेला अशा प्रकारे केलेली भाषा चुकीची आहे.
प्रश्न असा आहे की, शासकीय कर्मचारी जर जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असेल, पक्षीय ओळखीतून काम करत असेल, तर त्यावर प्रशासकीय शिस्तीतून कारवाई होणं अपेक्षित असतं. पण त्याऐवजी थेट राजकीय दबावाचा वापर करून धमकी दिली जात असेल, तर तीदेखील लोकशाही प्रक्रियेत चुकीचे आहे.