शेवगाव, रवींद्र उगलमुगले :आरोपीकडून दीड कोटींची लाच स्वीकारली; अहिल्यानगरचे चार पोलिस निलंबित शेअर मार्केट घोटाळ्यामधील आरोपीला अटक न करण्यासाठी दीड कोटी रुपयाची ऑनलाईन पद्धतीने लाच स्वीकारणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या चार जणांना निलंबित करण्यात आल्याची माहिती अहिल्यानगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सोमवार दिली.
आरोपीकडून दीड कोटींची लाच स्वीकारली; अहिल्यानगरचे चार पोलिस निलंबित या प्रकरणविषयी मिळालेली माहिती अशी की, शिर्डी येथील ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीच्या संचालकांनी शेअर मार्केट मध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एकूण आठ लाख रुपयांची फसवणूक करून ते पसार झाल्या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी भुपेंद राजाराम सावळे यांच्याकडे शेअर मार्केट घोटाळा तपासाच्या अनुषंगाने पोलिस चौकशी केली असता शेअर मार्केट मधिल चढ उतारामुळे मोठ्या प्रमाणात घाटा आल्यामुळे गुंतवणूक दारांचे पैसे पुन्हा माघारी मी वेळेवर देऊ शकलो नाही असे त्यांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितली होती.
एक पोलीस अधिकारी व तीन पोलीस कर्मचारी निलंबित – पोलिस अधीक्षक
सदर तपास, अधिकारी यांनी दिलेल्या तपास अहवालावरुन स्थानिक गन्हे शाखेचे पोलिस सब इन्स्पेक्टर तुषार धाकराव, पोलिस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, गणेश प्रभाकर भिंगारदिवे यांना निलंबित करण्यात आले आहे. असे जिल्हा पोलिस
अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
जे पोलीस अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात गाजलेल्या शेअर मार्केट घोटाळ्यात आता पोलीसांचाही सहभाग असल्याचे दिसून आल्यामुळे सर्व सामान्य लोकांनी आता न्याय मागायचा कोणाकडे हा फार मोठा गंभीर प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यात निर्माण झाला आहे. शेअर मार्केट घोटाळ्यात जे जे दोषी सापडतील त्यांची कोणाचीही गय केली जाणार नाही. एल सी बी ने ही पैसे घेतले असतील तर त्यांच्या वर ही कडक कारवाई केली जाईल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.