पावसाळा सुरू झाला की लगेच अनेकांच्या आरोग्याविषयी तक्रारी सुरू होतात. कारण पावसाच्या पाण्याने आसपासचा सगळा परिसर ओलसर होऊन जातो आणि त्यामुळे आजार पसरतात. त्यातच ऐन पावसाळ्यात कधीकधी जास्तीचे ऊन पडते आणि गर्मीने शरीराची लाहीलाही व्हायला सुरुवात होते. या मे – जूनच्या काळात कधी ऊन, कधी पाऊस तर कधी थंडी या बदलत्या हवामानामुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप हे आजार होतात. त्यामुळे पावसाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे हे पाहुयात.
- पावसाळ्यात थंड पाणी आणि कोल्ड्रिंकचा पिणे टाळा.
- पावसाळ्यात हलका व पौष्टिकच आहार घ्या.
- या दिवसात पालक, मुळा, कांदे व लसूण खाणे टाळावे.
- पावसाळ्यात सुका मेवा कमी प्रमाणात खावा.
- जेवणात फळे, सलाड व ज्यूस घ्या.
- उघड्यावरचे तेलकट पदार्थ खाऊ नका.
- पावसाळ्यात चहामध्ये अद्रकाचा वापर करू शकता.
- बाहेर पडताना छत्री, रेनकोटचा वापर करा.
- गाडी चालवताना स्लिप होणार नाही याची काळजी घ्या.