भारतीय विद्यार्थ्याला एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक देतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. हा व्हिडीओ अमेरिकेतील न्यूयॉर्क विमानतळावरील असल्याचं सांगितलं जात आहे. विमानतळ पोलिसांकडून हा विद्यार्थी मानसिक संतुलन बिघडलेला असल्याचं सांगून त्याला खाली पाडून बांधण्यात आलं. मात्र मी मानसिकदृष्ट्या सक्षम आहे, असं हा विद्यार्थी ओरडून सांगत होता. प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की विद्यार्थी हरियाणाच्या भाषेत बोलल्याचं ऐकायला येत होतं. अमेरिकेने व्हिसा निर्बंध कडक केल्यानंतर विद्यार्थ्यांची तपासणी आणखी कडक केली आहे आणि हा त्याचाच भाग मानला जात आहे. ऑस्ट्रेलियातही भारतीय विद्यार्थ्यासोबत असाच प्रकार घडला होता. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात सापत्न वागणूक दिली जातेय का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
Viral News | भारतीय विद्यार्थ्याला अमेरिकन विमानतळावर अमानुष वागणूक
