भारताच्या जीडीपीची वाढ या चालू वर्षात ६.३ टक्के दराने होईल असा सुधारित अंदाज वर्ल्ड बँकेने जारी केला आहे. जानेवारीच्या अंदाजानुसार वर्ल्ड बँकेने हा दर ६.७ टक्के असा सांगितला होता, मात्र अपेक्षित गुंतवणूक न आल्याने आणि निर्यात घटल्याने आता विकास दर सुद्धा वर्ल्ड बँकेने घटवला आहे. दरम्यान, फक्त भारतच नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेचाही सुधारित अंदाज २.७ टक्क्यांवरुन वर्ल्ड बँकेने आता २.३ टक्के एवढा सांगितला आहे, जो २००८ च्या जागतिक मंदीनंतरचा सर्वात कमी आहे. असं असलं तरी भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल, असंही वर्ल्ड बँकेचं म्हणणं आहे. सध्या विकसनशिल देश जास्तीचे टेरिफ लावण्यावर भर देत आहेत, मात्र टेरिफ कमी करुन जास्तीत जास्त आयात निर्यात कशी करता येईल याचा प्रयत्न करावा, असंही वर्ल्ड बँकेने म्हटलं आहे.
वर्ल्ड बँकेने भारताचा अंदाजित विकास दर घटवला, कारण काय?
