मुंबई : आपण जर फोनपे, गुगल पे किंवा या सारखे यूपीआय अॅप्स दररोज वापरत असाल तर १ ऑगस्ट २०२५ पासून काही महत्त्वाचे यात बदल करण्यात येत आहेत. हे बदल नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआय ने यूपीआय पेमेंट्स जलद, सुरक्षित आणि अधिक स्थिर करण्यासाठी तयार केले आहेत. बँका आणि पेमेंट अॅप्ससाठी हे नवीन एपीआय वापर नियम आणत आहे.
१ ऑगस्ट पासून आपल्या खात्यातील बॅलन्स तपासण्याची मर्यादा ५० वेळा करण्यात आली आहे. म्हणजे आपण अनावश्य बॅलन्स तपासणे टाळणे गरजेचे आहे.
आपल्या मोबाईल नंबरशी कोणती बँक खाती जोडली आहेत हे तपासण्याची मर्यादा आता दिवसातून फक्त २५ वेळा करण्यात आली आहे.
ज्यावेळी आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवतो त्यावेळी आता समोरच्या व्यक्तीचे नाव आपणास दिसणार आहे.
याशिवाय अनेक बदल हे ऑगस्ट महिन्यापासून लागू होणार आहेत. UPI वापराला अधिक जलद आणि सक्रीय करण्यासाठी हे बदल आवश्यक असल्याचे NPCI ने सांगितलं आहे.