मुंबई : मुंबईच्या वरळी येथील एनएससीआय डोममध्ये ५ जुलै २०२५ रोजी झालेला ‘मोठा विजयी मेळावा’ हा महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत ऐतिहासिक आणि भावनात्मक घटना ठरली. तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधूंनी एकाच मंचावर उभे राहून मराठी अस्मिता आणि भाषेच्या संरक्षणासाठी उत्सव साजरा केला दोघांनी एकमेकांना मिठी मारून उपस्थितांना अभिवादन केलं, ज्यामुळे हा प्रसंग अतिशय संस्मरणीय ठरला. राज ठाकरेंनी या भाषणात फडणवीसांनी आम्हाला एकत्र आणलंय, असा टोला लगावला, तर उद्धव ठाकरेंनी पुढेही असंच एकत्र राहण्याचे संकेत दिले.
हा मेळावा द्विभाषिक धोरणाविरोधी असल्याने मोठ्या उत्साहाने घेतला गेला. महाराष्ट्र सरकारने मराठी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये वर्ग १ पासून हिंदी शिकवणुकीची योजना रद्द केल्याबद्दल ठाकरे बंधूंनी सामूहिक आनंद व्यक्त केला . राज ठाकरे यांनी हे धोरण हे ‘मराठी विरुद्ध हिंदी एक जबरदस्तीचा प्रयोग’ असल्याचा आरोप केला, तर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर मराठींची एकात्मता मोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला लगावला. राज ठाकरेंच्या मते, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा हा एक प्रयोग होता, पण मराठी माणसाच्या एकजुटीमुळे हा प्रयोग हाणून पाडला गेला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या भाषणातून सगळ्यांचा समाचार घेतला. शिवाय राज ठाकरे यांचा सन्माननिय असा उल्लेख करत तो उल्लेख करण्यामागचं कारणही सांगितलं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह मोठे नेते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी राज ठाकरे यांनी स्वतः या सर्व नेत्यांना स्टेजवर बोलावलं आणि मराठीच्या एकीसाठी एकत्र आल्याबद्दल आभारही मानले.
राज ठाकरे यांचं भाषण
उद्धव ठाकरे यांचं भाषण