परभणी : महादेवीप्रमाणे वानर, हरिण, रानडुक्कर वनतारामध्ये घेऊन जाण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे विनंती कोल्हापुर जिल्ह्यातील महादेवी हत्तींनी प्रमाणे ग्रामीण भागातील वानर, नील गाय, हरीण, रानडुक्कर व विषारी साप गुजरात येथील वनतारा अभयअरण्यात स्थलांतरीत करण्याची विनंती परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याविषयीचे निवेदन परभणीचे जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मार्फत दिले आहे.
महादेवीप्रमाणे वानर, हरिण, रानडुक्कर वनतारामध्ये घेऊन जाण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे विनंती कोल्हापुर जिल्ह्यात नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला गुजरात येथील अंबानींच्या वनतारा या अभयारण्यात नेण्यात आले. त्याच पद्धतीने परभणी जिल्ह्यात देखील वन्य प्राणी संख्या झपाट्याने वाढली आहे. जिल्ह्यात अभयअरण्य नसल्यामुळे हे वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी करतात. त्याची नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळत नाही.
पोटच्या पोरा प्रमाणे वाढवलेले पीक वन्य प्राण्यान मुळे धोक्यात आले आहे. त्यातच रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यायला गेलेल्या शेतकऱ्यावर रानडुक्कर, साप हल्ला करतात त्यात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्व झाले आहे. गावा-गावात वानर-माकड यांच्या टोळ्या झाल्या आहेत. ते गावातील लहान मुले व महिलावर हल्ले करत आहे. यांच्या बाबत अनेकदा वन विभागात तक्रार करून देखील काहीच कार्यवाही करण्यात येत नाही. तसेच शेतकर्यान बरोबर वन्य प्राण्यांना सुद्धा धोका आहे.
कारण शेतकरी त्यांच्या पिकावर किटक नाशक फवारणी करतात. फवारणी केलेले सोयाबीन, कापुस, मका, मुग, उडीद, ज्वारी खाऊन त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. त्यामुळे वानर, नील गाय (रोही), हरीण, रानडुक्कर, विषारी साप हे सर्व पकडुन गुजरात येथील वनतारा येथे नेण्यात यावे जेणे करून त्यांची उत्तम काळजी घेण्यात येईल आणि शेती व शेतकऱ्यांचे नुकसान देखील होणार नाही अशी विनंती किशोर ढगे, गजानन तुरे, मुंजाभाऊ लोडे, प्रसाद गरुड, माऊली शिंदे, राम दुधाटे, विकास भोपळे यांनी केली आहे.