मुंबई : भारतातील पहिले अत्याधुनिक टेस्ला कंपनीचे शोरूम मुंबईत सुरू झाले असून आता भारतीय ग्राहकांना टेसलाच्या ईव्ही कार खरेदी करण्यासाठी लवकरच उपलब्ध होणार आहेत. Y व्हेरीयंट २ प्रकारात आणि ६ रंगात ही गाडी खरेदी करता येईल. परंतु भारतात असलेली टेस्लाची किंमत किती प्रतिसाद मिळतो हे पुढील काळात समजेल.
टेस्लाची कार खरेदी करण्यासाठी सर्वात प्रथम २२,२२० रुपये टोकन रक्कम द्यावी लागणार आहे. त्यानंतर पुढील ७ दिवसात ३ लाख रुपये भरून गाडी अंतिम नोंदणी करावी लागेल तरच टेस्ला कंपनी ग्राहकाला कार उपलब्ध करून देणार आहे.
भारतातील टेस्लाची किंमत ५८.८९ लाख ते ६९.६८ लाख दरम्यान असणार आहे. एकंदरीत टॉप मॉडेलची किंमत ही ७० लाख रुपये असेल. परंतू भारतात एवढ्या मोठ्याप्रमात असलेली किंमत पाहून सोशल माध्यमांवर चर्चा रंगत आहेत. टेस्लाची किंमत पाहून तुम्हाला काय वाटतं भारतात किती प्रतिसाद मिळेल?