भावना गवळींनाही आता आयकर विभागाची नोटीस, थेट जप्तीचा इशारा

IT issues notice to bhavana gawali

वाशिम : खासदार श्रीकांत शिंदे आणि संजय सिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचं प्रकरण समोर आलेले असतानाच शिवसेनेच्या आणखी एक नेत्या आयकर विभागाच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळतंय. शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांनाही आयकर विभागाने तब्बल १२० कोटी रुपयांची नोटीस बजावली होती. आता यापैकी ८ कोटी ६ लाख रुपये वसुली करण्याची दुसरी नोटीसही गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेला देण्यात आली आहे.

भावना गवळी यांच्या महिला उत्कृष्ट प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेची १०० कोटी रुपयांची संप्पती त्यांच्या कंपनीच्या नावे केली होती. या प्रकरणी इनकॅम आयकर विभागाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती अथवा कर भरण्यात आला नव्हता. त्यामुळे आयकर विभागाने कर चोरी केलेल्या रकमेच्या १२० टक्के अर्थात १२० कोटी रुपयांची नोटीस संस्थेला बजावली होती. तसेच संस्थेची सर्व बँक खातीही गोठवली होती. 

याप्रकरणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला आपली बाजू मांडण्यासाठी वेळोवेळी संधी देण्यात आली, मात्र त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे १९ जून २०२५ रोजी ८ कोटी ६ लाख १३ हजार ३७१ रुपये वसुलीची अंतिम नोटीस बजावली होती आणि पुढील ७ दिवसात म्हणणं मांडण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भावना गवळी यांच्या संस्थेकडून कोणताही उत्तरं देण्यातं आलं नाही. 

आयकर विभागाचे मुख्य निरीक्षणे –

दिनांक १९.०६.२०२५ रोजी पाठवलेल्या नोटिशीद्वारे ८.२६ कोटींची थकबाकी नमूद.

डिसेंबर २०२३ मध्ये खात्रीशीर उत्तर न दिल्यामुळे बँक खाती गोठवण्यात आली.

वारंवार नोटिशी आणि अंतिम संधी असूनही संस्थेने उत्पन्न लपविल्याचे निदर्शनास.

दिनांक २९.०४.२०२५ रोजी कलम १४८ अ अंतर्गत आदेश काढून पुढील प्रक्रिया सुरू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *