गुरुग्राम, हरियाणा : राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता हरियाणातल्या गुरुग्राममध्ये घडली. घरातील पहिल्या मजल्यावर मुलगी आणि वडील यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर राधिकाच्या वडिलांनी परवाना असलेली बंदूक काढली आणि मुलीवर तीन गोळ्या झाडल्या.
२५ वर्षीय राधिका यादव ही राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू असून प्रसिद्ध खेळाडू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिकाने सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यासाठी एक रिल तयार केलं होतं आणि या रिलमध्ये काही गोष्टींवर तिच्या वडिलांचा आक्षेप होता. मात्र हा आक्षेप मान्य करायला तयार नव्हती. मुलगी आपलं ऐकत नसल्याचं पाहून संतप्त झालेल्या तिच्या वडिलांनी बंदूक काढली आणि मुलीवर तीन राऊंड फायर केले. या घटनेनंतर राधिकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिचं उपचारापूर्वीच निधन झालं. पोलिसांना रुग्णालयाकडूनच या घटनेची माहिती मिळाली.
राधिका यादव कोण होती?
राधिका यादवची आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंमधील रँकिंग ही ११३ वी होती आणि ती दुहेरी टेनिसपटू होती. राधिकाचा जन्म २३ मार्च २००० साली झाला होती आणि ती जगातल्या पहिल्या २०० दुहेरी टेनिसपटूंमध्ये होती.