अहमदाबादमध्ये मागील काही दिवसांपूर्वी एअर इंडियाचे एक विमान कोसळले आणि त्यात एक प्रवासी वगळता सगळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी एका बारावीत शिकणाऱ्या आर्यन नावाच्या विद्यार्थ्याने याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्याला आता पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू केली आहे.
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात आतापर्यंत २७५ मृत्यू झाले असून या विमान अपघातामागे घातपात होता का? याची चौकशी तपास यंत्रणा करत आहेत. याच कारणामुळे व्हिडिओ काढणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. हा व्हिडिओ नेमका त्याचवेळी कसा काढला यावरही पोलिसांना संशय व्यक्त केला असून तपास पोलिस करत आहेत.
मात्र आर्यनने याविषयी सांगितले की, मी माझ्या नातेवाईकांकडे अहमदाबादमध्ये आलो होतो. याआधी मी एवढ्या जवळून कधीच विमान पाहीले नव्हते म्हणून गावाकडच्या मित्रांना व्हिडिओ दाखवण्यासाठी केला. ते विमान कोसळेल याची कल्पना सुद्धा नव्हती. त्यामुळे आता पोलिस या प्रकरणात आणखी काय शोध लावतात ते महत्वाचे ठरणार आहे.