राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सरकार दरबारी वेळोवेळी मांडून सुटत नसल्याने प्रहारचे प्रमुख माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या त्या आंदोलनाला राज्यभरातून आणि देशातून जोरदार प्रतिसाद मिळाला. आंदोलनाला वाढता प्रतिसाद पाहून सरकारकडून चर्चा करण्यात येत होत्या. परंतू कोणतेही ठोस आश्वासन मिळत नसल्यानं हे आंदोलन आजपर्यंत सुरूच होते. मात्र आज शनिवार 14 जून रोजी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारच्या वतीने चर्चा करून काही निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले असल्याने हे अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली.
महसूल मंत्री यांच्याकडून देण्यात आलेल्या आश्वासनात येत्या 15 दिवसात शेतकरी कर्ज माफी साठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार आहे. नवीन कर्ज वाटप आणि कर्ज वसुलीला स्थगिती सुद्धा देण्यात येणार आहे. 30 जूनच्या पुरवणी बजेट मध्ये दिव्यांगासाठी तरतूद करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त जय मागण्या आहेत त्या त्या विभागाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या सगळ्या आश्वासनामुळे हे अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.