महाराष्ट्रात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने मान्सूनच्या पावसाला मोठा फटका सहन करावा लागला. राज्यात पुन्हा एकदा कमाल तापमान चाळीशीपार गेल्याचे पाहायला मिळाले. त्यात आता मान्सूनच्या पावसाने सुरुवात केली असून बुधवार, ११ जून रोजी सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
मागील २४ तासांमध्ये विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, जळगाव येथे चाळीशी पार तापमान होते तर मराठवाड्यात मध्यम टे जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
आज बुधवार, ११ जून रोजी राज्यात बहुतांश भागात येलो अलर्ट देण्यात आला असून विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.