मुंबईतील मुंब्रा लोकल रेल्वे स्थानकाजवळ समोवारी एक मोठी दुर्घटना घडली. ज्यामध्ये ५ रेल्वे प्रवाश्यांचा मृत्यू झाला तर अनेजण गंभीर जखमी झाले. या झालेल्या अपघाताची रेल्वेद्वारे चौकशी करण्यात येणार असून त्यासाठीची समिती स्थापन करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या या समितीत कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ विभागीय ऑपरेशन मॅनेजर, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती झालेल्या घटनेचे कारण शोधणार असून पुढील काळात अशी दुर्घटना होणार नाही यासाठी उपाय सुचविणार आहे.