मिर्झापूर या वेब सीरिजच्या गेल्या तीन सिझनला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं आणि प्रेक्षक आता चौथ्या सिझनची वाट पाहत आहेत. या सीरिजमध्ये गोलूची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने एक हिंट दिली आहे, ज्यानुसार चौथा सिझन जुलै २०२५ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. एका मुलाखतीत बोलताना श्वेता म्हणाली की गेल्या वर्षीचा सिझन ३ हा माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आला होता आणि यावर्षीही तसंच काही होईल, अशी अपेक्षा करुयात. यावरुन अंदाज लावला जातोय की मिर्झापूरचा नवीन सिझन पुढच्या महिन्यात रिलीज होईल. अमेझॉन प्राईमकडून याबाबत अजून कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाही, मात्र गोलूच्या कमेंटमुळे हा एक अंदाज बांधला जात आहे.
मिर्झापूर सिझन ४ ची रिलीज डेट ठरली? श्वेता त्रिपाठीने हिंट दिली
