कमल हसन हा अभिनेता त्याच्या अॅक्शन पॅक्ड सिनेमांसाठी प्रसिद्ध असला तरी कित्येक वर्षांनंतर पहिल्यांदाच दक्षिणेतील प्रेक्षकांनीही त्याच्या सिनेमांकडे पाठ फिरवली आहे. २०० कोटी रुपये खर्चून तयार केलेला ठग लाईफ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला आहे. या सिनेमाने गेल्या सहा दिवसात फक्त ४० कोटींचीच कमाई केली असून बॉक्स ऑफिसवरील कमाई प्रचंड घटली आहे. हा सिनेमा तीन भाषांमध्ये रिलीज करण्यात आला असून प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
कमल हसनचा ठग लाइफ जोरदार आपटला, बजेट २०० कोटी, कमाई किती?
